तुझ्या मनी दाटलेला..आठवात साठलेला..
थेंब थेंब भिजताना..ह्रिदयात रुजलेला...
वारा तनी भिनलेला..शीण मग शिणलेला ..
डोळ्यातून पाहताना धागा धागा विणलेला..
काहूरचे देन मला..सावरू मी सांग भला..
गुपचूप राहताना.. बोल बोल बोललेला..
शहारून आली सखे..सोहळाच सजलेला..
कान्हा तनी भिनताना,काठ काठ भिजलेला..
एकटीच राहताना....उभा पुढे ठाकलेला...
क्षणोक्षणी सदोदित..मनामध्ये राखलेला..
@ॐ(अमोल२२कर)