Thursday, 10 April 2014

त्यावेळीस ........

मला  ठावूक  आहे  तू  जेव्हाही  येशील  ...
त्यावेळी  कवितांचा  पाऊस  घेवून  येशील ...
पुसून  टाकशील ...सारी दुःख   ...मरगळ ...
अन  सामावून  घेशील  मला.....  खोलवर ..... अगदी  खोलवर....  तुझ्यात ....
अन  लपवून  ठेवशील  मला ...ह्रिदयाच्या  एका  सुरक्षित  कप्प्यात
अगदी  तसाच  जशी  लहान मुलं  जपतात  आपली  आवडती  खेळणी ....
करून  देशील  जाणीव  मला....  मी  तुझ्यात  भिनत  असताना ..
माझ्या  सर्वस्वाची   अन  पूर्णत्वाची ...
अन  घेवून  जाशील  स्वतालाही....  अशा  जगात....
 जेथे  तुलाही  पूर्णत्व  असेल  माझ्या  अस्तित्वाने ...
त्यावेळी  श्वास  माझा  असेल  पण  हुंकार  तुझा ...
ह्रिदय  माझं  असेल  अन  ठोका  तुझा ...
स्पर्श  माझा     असेल  पण  शहारा   तुझा ...
तुझ्या  शरीरावर  उभा  असलेला  प्रत्येक  शहारा  त्यावेळी  तुला  जाणीव  करून  देईल  ...
त्या  सुखांची  ....जी  तुझ्या  विचारांच्या  अन  कल्पनेच्याही पल्याड   असतील ...
त्यावेळीस  तुला  जाणीव  होईल  परमोच्च  सुखाची ...जेव्हा  .....नुसती  माझी  नजर  भिडेल
तुझ्या  नजरेला ....
आणि  मग  तू  येशील  माझ्याबरोबर  अशा  जगात  जे  सुखान्पेक्षाही  खूप  परे  आहे ...
जिथे  एक  एक  स्पर्श  इतक्या  चेतनेचा  कि  त्यामधून  निघालेल्या  ऊर्जेमुळे  एक  आकाशगंगाच  निर्माण  व्हावी ....मग  तुला त्यावेळी  प्रणयाचे ...मिलनाचे  खरे  अर्थ  कळतील ...नुसते  कळणारच  नाही  तर  जाणवतीलही  .........उलगडतीलही .......
©ओम (अमोल२२कर ) 

तूच सांग आता..

मनी आज माझ्या ..रकाने रकाने ..
कुणी ते भरावे ..तूच सांग आता..
संघर्ष चालूच..दुखाचे सुखाचे..
कधी रे सरावे ...तूच सांग आता..
अदृश्य सारे ..धुकेसे धुकेसे..
कधी दृश्य होई ..तूच सांग आता..
आसुसलेले ....किनारे किनारे..
कधी संगमाचे योग सांग आता???
सखे आज ऐसे ..दुरावे दुरावे..
कसे मी उरावे ...तूच सांग आता...??
अजून का हवे रे.. पुरावे पुरावे???
सरून मी सरावे? तूच सांग आता...??
उभा कृष्ण दारी.. पुकारे पुकारे
सखे काय हवे ???तुला सांग आता??
@ओम (अमोल२२कर )

Friday, 14 March 2014

androids हाती आले..

अश्रू झाले स्वस्त आणि पाणी महाग झाले...
भावना हरवल्यात आता अन् smilies आले...
नातेही अर्थहीन...relation"statuse" झाले..
पाहिजे तेव्हा update अन् remove झाले...
मैत्रीही उरली नाही.. friends हजार झाले...
आवड असो नसो...likes common झाले...
प्रेमाचा सरला गंध..love affairs आले...
breakups अन् patchupsचे पर्व सुरू झाले..
ego कित्ती मोठे ..कपडे लहान झाले..
भावनाही गंजल्या आता feelingsचे युग आले..
likesअन्commentsवर माणूस गणला गेला..
कर्तुत्व..गुणांचे महत्व कमी झाले...
म्हणायला friendssssss खूप......... सारे......
पण प्रसंगी किती कामी आले ???????
सामाजिक बांधिलकी आज social media झाले...
काम हातच जाऊन ..androids हाती आले..
face दाखवत दाखवत बरेच book झाले..
कंदेपोहे पाहण्याचे सोहळे कमी झाले....
डोळे असून का..सांगा अंधत्व आले...????
बोटे बोलू लागली अन् ओठ मुके झाले......
ओम (अमोल22कर)

Monday, 3 March 2014

येईन मी

सोडला रे मी किनारा ....सागराला सांगूनी..
तमा नाही वादळाची ..येईल सारे झेलूनी....
तू सखे जावू नको..मोती आणाया चाललो..
येईन मी येईन मी ..सागर तळाला जावूनी..
@ओम (अमोल२२कर)