Sunday, 1 December 2013

सत्य एकची....

सखे गुलाबी थंडीलाही ..याद तुझी रे येते ...
त्याच गुलाबी पुन्हा क्षणांना, तनीमनी जागवते...
सांग कधी का तुटले आहे??? सती शिवाचे नाते..
काळाच्याही पल्याड काही..बंध बांधले जाते..
असू देत वळणे कितीही..असू देत वा रस्ते..
त्रिकालबाधित सत्य एकची..नदी सागरा मिळते...
गूढ कधी का कळले आहे????? सांग अथांगाचे....
तुझ्याच रेषा तुला सांगती..अतूट आपुले नाते....
डोळे मिटता आज सखे तू..ओढ अनामिक होते..
असेच होईल जन्म जोवरी...अन असेच झाले होते...
@ओम (अमोल२२कर )

Tuesday, 26 November 2013

आजही काही सामान घरी पडून आहे....

आजही काही सामान  घरी पडून आहे....
येत कधी कधी असच डोळ्यासमोर....
मग भूतकाळाची धूळ झटकतो मी ...
स्पष्ट होतात ....आठवणींची चित्र...
हे पडून पडूनही जपल कसं  जातं ?
हे कोडंच.. एकंदरीत, वाटतं विचित्र.....
कधी डायरी ,कधी वहीचं पान ....
वाचता वाचता मग हरपत भान...
कधी एखादं गिफ्ट , वस्तू किंवा तिकीट...
आईस्क्रीम च्या कांड्या किंवा जुनं पाकीट..
घडी घातलेला कधी मिळतो गिफ्ट पेपर....
कधी टिश्यू पेपर...कधी  chocklet च wraper....
कधी सुकलेल पान...कधी सुकलेल फूल..
गतक्षणांची देवून जाते हूल....
हे किंवा यासारख अजून काही प्रत्येक जण जपत असतो...
आठवण म्हणून..देन म्हणून..अथवा प्रायश्चित्त म्हणून देखील जपत असतो......
आपण ह्या वस्तू जीवापाड जपतो मग ती, माणसं
का जपत नाही........?????????????????
@ओम (अमोल २२कर)


Friday, 22 November 2013

असे अंतरांचे खेळ रंगलेले...

असे अंतरांचे..... खेळ रंगलेले...
कधीकाळचे ते स्वप्न भंगलेले ...
विसावले कधी जे.. सावलीत माझ्या..
खुशाल दूर गावा..कसे दंगलेले..???
म्हणे "सख्या!! मी तुळशी अंगणाची..
तिथे रातराणीचे ...खेळ मांडलेले....
मनसोक्त  पुनवेची.. तू ..रात खेळताना....
इथे आसवांचे..... रे पाट सांडलेले..
नको रे मना तू..कुणा जीव लावू...
जपून घे जीवना.. रे  दुभंगलेले..
आता दूर गेले ..शील माणसाचे..
विटाळूनी दैवत अखेर  भंजलेले..
@ओम (अमोल२२कर )

Thursday, 8 August 2013

पाऊस..आठवणी...मी

आज आला पाऊस खूप मुसळधार 
धुवून गेला मन…  कोपरा … अन सारं काही …
पण त्याला ना  स्पर्श धुता आले … ना आठवणी …. 
ज्या काही भलत्याच खास आहेत त्या व्यक्ती आणि ठिकाणासोबत …
का धुता आले नाही रे तुला हे सारे????
मी विचारले पावसाला!!!!!!!
तो म्हणाला मित्रा कोरलेल्या आणि गोंदलेल्या गोष्टी धुतल्या जात नाहीत …… 
उलट माझ्या वर्षावाने त्या अजूनच गडद  आणि स्पष्ट होतात…… 
:-) 
@ओम (अमोल२२कर )

Friday, 7 June 2013

आज सखे पावसाला….

आज सखे पावसाला…. उधान हा आला आला…
आठवांचे बीज पुन्हा…  अंकूरून गेला गेला…
तुझे माझे गुपित जे….  मनामधे दडलेले…. 
घडलेले सारे काही…. .  सांगून तो गेला गेला…
म्हणे कोणी वाट पाही??? तुझी मला पाहताना..
हात होता सुना सुना…. . काठ काठ पाणावला…
किती सखे दुरावला ??? क्षण आज ओला ओला 
सारे काही सखे तुला….  थेंब थेंब बोललेला…
मिठीमधे तुझ्यामाझ्या…श्वास श्वास पेरलेले..
कुण्या काळी पावसाने. .  असे काही घेरलेले….
भिनताना भिजताना… कुणीतरी आसुसले 
मन तुझे फितूर गा मीच सखे हेरलेले…. 
स्पर्श सखे तनामध्ये...मनामधे  कोरलेले....
ह्रीदयाचे ठोके सखे. .  सांग कसे चोरलेले...
आज सखे सुना सुना . . बरसतो पुन्हा पुन्हा. 
आज सखे सुना सुना . . बरसतो पुन्हा पुन्हा....
@ओम (अनमोल२२कर)


Saturday, 11 May 2013

मनाचे कोपरे….

मनाचे कोपरे…. ठाव ना  कुणाला …
असे ते किनारे…ओढ सागराला…
थेंबांचे काहूर…मना हुरहूर…
कुणाची फिकीर… आहे कुणाला ????
कुणी गुंतलेले … स्वप्नात रे रमाया…. 
कुणी साद घाली मनी अंतराला…. 
शब्दही अपूरे… डोळे  दाटलेले…
भाव साठलेले… कुणा ओळखाया…. 
@ओम (आमोल२२कर )

Thursday, 21 March 2013

ती जरा हट्टी आहे.....

ती जरा  हट्टी आहे.....
म्हणून तर आमची कट्टी आहे.....
कधी होईल मोठी देव जाने......
मनात काय तिच्या देव जाने...
पण तिला स्वप्नात रमायला आवडत...
तीच घर सजवायला आवडत.....
उगवत सूर्य आणि छोटंसं तळ तिला खूप खूप आवडत...
तिला आवडत फिरायला ..खूप मस्ती करायला....
तशी ती जरा  हट्टी आहे.....
जरा ??? भयंकर!!!!!!!
रागावली कि ऐकत नाही....
काही एक बोलत नाही.....
उगाच करते चिडचिड ....
त्याशिवाय जमत नाही.......
ती जरा  हट्टीच आहे.....
काळजी करण्यातही....जीव लावण्यातही...
गोष्टी निभावन्यातही.....अन सगळ सांभाळन्यातही.......
ती खूपच  हट्टी आहे.....
म्हणून तर आमची गट्टी आहे.................:-)
@ओम (आमोल 22कर)

Tuesday, 19 March 2013

गुंफण......

ती घरात माझ्या ..मनात माझ्या वावरते....
हळूच अलगत ....जीवास माझ्या सावरते....
ती इतकी.. साधी.. सरळ मनाची..भोळी..
दुरून पाहता..... कटाक्ष माझा बावरते....
गंधास तिच्या स्पर्षास तिच्या रे गोडी..
शब्द मधाचे ओघळ पाकळ्या उलगडते..
डोळ्यात तिच्या रे पाहण्या भलते अवघड...
किनार काजळी पाहता काळीज धडधडते...
भले सुटेना मरणाचे हो कोडे..
पण जगण्याचे ती कोडे सहजच सोडवते....
@ओम (अमोल२२कर)

Wednesday, 6 March 2013

"मित्रांनीच मला जगवल..."

खिशात नसताना पैसे मौज करायला शिकवलं...
एक कटिंग दोघात...अन हसायला शिकवलं...
'फेल ' झालो हे ऐकून हसलेले सारे....
पण रात्र रात्र पुस्तकांना माझ्याबरोबर जागवल....
इतके साले हरामखोर ..आपलं दुःख लपवायचे...'
कोपऱ्यात जाऊन एकाकीच रडायचे...
विचारलं काय झालं ? तर "२२कर
काही नाही!! काही नाही !! करायचे....
पण त्या काही नाहीतल..बरच काही मला मात्र कळायचं...
अनावर होवून त्यांनी...जवळ माझ्या रडायचं...
मित्राचे अश्रू  पहायलाही ...भाग्य लागत...
अन ते पेलायला काळीज....
कारण सच्च्या व्यक्ती कधी कुणाकडे उलगडत नाही..
सुख वाटन जमतं त्यांना पण दुःख वाटन जमत नाही....
म्हणून ते आजही काळजाजवळ असतात...अन
काळाला जवळ येवू देत नसतात.....
मी होतो शुन्य त्यावेळी फक्त तुम्हीच होतात..
आज सात अंकी संख्या झालो तर बरेच येतात...
पण साल्यानो तुम्हाला कोणीच ' रिप्लेस ' नाही करणार...
मनात माझ्या कुणी ती ' प्लेस ' नाही घेणार....
खर सांगतो शप्पथ आहे कट्ट्यावरच्या ' कटींगची'..
 झालो असेल जरी मी कवी अन लेखक..अभिनेता अन
दिग्दर्शक..जरी आज म्हणत असेल जग ओम सर.....
तुम्च्यासाठी मी फक्त तोच २२कर ..................
फक्त तोच २२कर ..............................................
@ओम (अमोल२२कर)

Tuesday, 12 February 2013

मैत्रीत धुंद वेड्या..


येथेच काल होता ..माहोल तो निराळा...
एकांत आज वेडा..बाकी कुणी दिसेना....
बाके अशी रिकामी..मनात पोकळी का?
आहे तसेच सारे...काही तसे दिसेना...
मैत्रीत धुंद वेड्या..वाटा गहाळ झाल्या..
ते झुंड पाखरांचे..आता पुन्हा दिसेना...
आज आसवांचे ...मोती बरेच झाले...
आज आठवांना..रस्ताच का उरेना?
क्षितिजापाल्याड गेले..सारेच सोबती ते..
ह्रिदयात कोरलेले एक नावही पुसेना...
@ओम(आमोल २२कर)

Saturday, 2 February 2013

नाद देत आहे.....

हा नील बासरीचा...नाद देत आहे....
आपूस पैंजणाची ..साद येत आहे...
सांगरे घना तू....दाटून टच्च झाली..
मोती असेच आले कि याद येत आहे?
अंतरांनी आता विणले खुशाल जाले...
परि अंतरित मिलना फिर्याद येत आहे ...
का नाव जोडलेले... नीलचे  घनाला...
गोकुळात भलता हा वाद होत आहे..
हि बातमी युगाला..आतूर  ती जहाली..
नाद येत कानी...ती साद देत आहे.....
@ओम (अमोल२२कर)