गाऊ हृदयातूनी ...
Monday, 26 November 2012
परिंदा.....
काही माणसं जगावेगळी असतात....
जी फार मोजकीच
असतात...
खूपच दुर्मिळ....
अगदी शोधूनही न सापडणारी...
पण तू त्यात बसत नाही....
कारण तू नुसती
जगावेगळी नाहीस,
तर "माझ्या जगाला
वेगळेपण देणारी आहेस..."
@ओम (आमोल २२कर )
Wednesday, 7 November 2012
निशब्द होती शब्द सारे..
निशब्द होती शब्द सारे..
भावही डोळ्यातले..
शब्दही पडती अपुरे..
पाणावलेले काठ रे...
मी जरी शब्दांस राजा..
पारखा शब्दास रे...
हरवल्या ओठांत वेड्या.
शोधतो शब्दास रे ..
कोण तू आहेस वेडी?
कोणत्या जगतात रे?
नाते असे हे कोणते?
आजचे का जन्मांतले....
का होते काही कळेना?
तू मला का सांग रे..
दूर जाता मी कधी का?
नयनांत दाटे रांग रे..
घोर का लागे जीवाला?
तुटतो असा का बांध रे?
सांग मजला लागे कसा तुज?
ह्या मनाचा थांग रे?
@ॐ(अमोल२२कर)
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)