Friday, 14 December 2012

तू घना.......


बहरून घे...आता सखे....
हि वेळ रे...नाही पुन्हा...
घाली मुरारी.. साद रे...
धावून ये रे तू घना...
वेढून बसली का सखे?
आतुर या..झाल्या मना?
ह्या क्षणाची देन ही...
भिनवून घे न तू घना..
तो नील रे शोधे तुला..
बिलगून ये ना तू घना...
स्वर्गही स्थिरावला....
नजरेत बघ ना तू घना..
नयनात तू  सजली सखे..
का दुरावा सांग ना ?
ठोक्यात मी..श्वासात मी..
का पुरावा सांग ना ???
येशील तू ..तोडून ते..
बंध रे माझ्या घना...
नील भिनला नसात रे..
कणो कणी तुझिया घना..
@नीलघना (आमोल २२कर)

Saturday, 1 December 2012

देवा तू..........

देवा तू आयुष्याचा...जुलूस मांडला आहे...
जीवनाच्या तू बाजरी ..माणूस खांडला आहे..
हीच क्रांती उत्क्रांती?सांग मला तू आता?
जनावारांहून खाली,माणूस भांडला आहे....
पराधीन का केला? भक्तीच्या नावाखाली...?
दिशाभूल झुन्डींचा.. कळप सांडला आहे...
बुद्धीचा द्योतक माणूस, अंध कसा रे झाला?
भोन्दुंच्या ताटाखाली का उगा डांबला आहे ?
धावून ये तू आता..तुझे सोडण्या कोडे...
हा चालायाचे  सोडून..... उगा थांबला आहे.....
@ओम(आमोल २२कर)


Monday, 26 November 2012

परिंदा.....


काही माणसं जगावेगळी असतात....
जी फार मोजकीच असतात...
खूपच दुर्मिळ....
अगदी शोधूनही न सापडणारी...
पण तू त्यात बसत नाही....
कारण तू नुसती जगावेगळी नाहीस,
तर "माझ्या जगाला 
वेगळेपण  देणारी आहेस..."
@ओम (आमोल २२कर )

Wednesday, 7 November 2012

निशब्द होती शब्द सारे..

निशब्द होती शब्द सारे..
भावही डोळ्यातले..
शब्दही पडती अपुरे..
पाणावलेले काठ रे...
मी जरी शब्दांस राजा..
पारखा शब्दास रे...
हरवल्या ओठांत वेड्या.
शोधतो शब्दास रे ..
कोण तू आहेस वेडी?
कोणत्या जगतात रे?
नाते असे हे कोणते?
आजचे का जन्मांतले....
का होते काही कळेना?
तू मला का सांग रे..
दूर जाता मी कधी का?
नयनांत दाटे रांग रे..
घोर का लागे जीवाला?
तुटतो असा का बांध रे?
सांग मजला लागे कसा तुज?
ह्या मनाचा थांग रे?
@ॐ(अमोल२२कर)


Tuesday, 30 October 2012

काठ काठ भिजलेला..


तुझ्या मनी दाटलेला..आठवात साठलेला..
थेंब थेंब भिजताना..ह्रिदयात रुजलेला...
वारा तनी भिनलेला..शीण मग शिणलेला ..
डोळ्यातून पाहताना धागा धागा विणलेला..
काहूरचे देन मला..सावरू मी सांग भला..
गुपचूप राहताना.. बोल बोल बोललेला..
शहारून आली सखे..सोहळाच सजलेला..
कान्हा तनी भिनताना,काठ काठ भिजलेला..
एकटीच राहताना....उभा पुढे ठाकलेला...
क्षणोक्षणी सदोदित..मनामध्ये राखलेला..
@ॐ(अमोल२२कर)

Thursday, 30 August 2012

कळून सखे सारे..


किती दडवशील सखे...
आज भावनांचे ओझे..
भार सोसेना सोसेना 
म्हणे काळीज ग तुझे..
कसा टिपूस टिपूस..
आज दाटे डोळ्यामधे..
घ्यावा ठासून ठासून..
कहर उरामधे..
किती घेशील घेशील 
सखे उगा आढेवेढे...
सांग सुटे का एकाने..
हे प्रणयाचे कोडे...
असे जीवास जीवास
सांग उगा का छळावे..
कळून सखे सारे..
सांग काही ना कळावे..
@ॐ(अमोल२२कर)

Monday, 27 August 2012

नीलघना बरसून ये ना.............


नीलघना बरसून ये ना.....
मजवरी तू आज पुन्हा...
जपून ठेवीन वर्ष वर्ष मी..
कोरल्या तू खानाखुणा...
तख्त तोडतील क्षणात ऐस्या 
मनी उसळल्या भावना..
घे समेटून सागरा तू..
टच्च दाटल्या या घना..
मिटले डोळे ..हात पसरुनी..
कवेत मजला तू घे ना..
काय असते विरघळ ने..
तूच मला रे दावना....
आसुलेली आहे काया..
चिंब चिंब रे भिजण्या..
मीही दावीन सोहळे तुजला..
शक्य.. विजा तू झेल ना....
जरी असशील राजा नीलघना
समावशील माझ्या नयना..
बघ लागे का थांग मनाचा...
शोधूनही तुझ्या मना......

@ओम(अमोल२२कर)

आठवणी...........

आठवणीपन खूप स्वाभामानी असतात..
त्या काही प्रत्येकालाच येत नसतात..
त्यासाठी...भावनांना..नात्यांना..
जीवापाड..जपावं लागतं..
त्यासाठी खपावं लागतं..
मग जावून त्या कुठेतरी..
रुजतात...अंकुरतात..उमलतात...
फुलतात..बहरतात..अन..मग..
अमर होतात...मनाच्या क्षितिजावर..
त्यासाठी..शाबूत राखावं लागतं पावित्र्य..
मनाचं...भावनांचं,... विचारांचं...
मग त्या झुंडीने येतात...
मनसोक्त बरसतात..
ॐ(अमोल२२कर)

Thursday, 23 August 2012

रंगला सखे कसा ?


खेळताना खेळ हा, रंगला सखे कसा ?
शब्द शब्द आज रे, गुंफला सखे कसा?
मांडला हा डाव का? आज तू सखे कसा?
अक्षराक्षर दावतो..सखे तुझाच आरसा...
दडवून तू का ठेवते..बंध हा सखे कसा..?
लपवून हि ना लपे..छंद हा  माझा असा..
मी मुरारी नांदतो..नयनात रे सखे असा..
जाणीव जागे अंतरी..नवचेतना सखे जसा..
शाहऱ्यात का मी उभा, सांग ना सखे कसा?
श्वासातही दाटून मी ..सांग ना येतो कसा?
उरात मीच स्पंदतो..दाटतो सखे कसा?
हवाहवासा वाटतो.सहवास हा सखे कसा?
संवेदनाही साठूनी..ध्यास हा मनी असा..
नाते हवे जन्मास हे..भाव हा नयनी कसा?
आवडे का मी तुला..आहे असा आहे जसा..?
रोज का सखे असा जपते सखे का वारसा?
@ओम(अमोल२२कर)


Tuesday, 21 August 2012

भावना..


 घे सामावून आज तू ...लाजलेल्या भावना..
जपूनही सुखावल्या...जाणलेल्या भावना..
आज स्मृती कोरल्या..व्यक्त झाल्या भावना..
आसुसले नाते हवे..शहारलेल्या भावना..
तन मन पवित्रता स्पर्शलेल्या संवेदना..
एकरूप एकाग्र ते  भावात डोळे जाणिवा..
सर्वांगी ओथंबल्या..सुगंधित वेड्या भावना..
तू मी नशिबास या..हातात हाती जीवना...
नेई  मिलन इच्छित ते..पूर्णत्व रे  प्रेमास या..
प्रतिबिंब मनी साकारले निशब्द झाल्या भावना..
सखी सख्यास सोबती..जीवनी सहवास हा..
स्वप्नी चंद्रास ओढही..रातीत जागे भावना..
स्पंदनांची बंधने..अनमोल घनाची आस ना..
साथी असे मग सोबती..हाच मनाचा ध्यास ना..
अथांग या मेघातुनी ..असंख्य तारे साथीस या..
चिरकालीन ओढही..निरंतर लागली गा मना..
सदैव जन्मी तूच  मी..अप्रतिम सांगड  आपणा
जोड ऐसी तोड ना..दैवी अशा त्या भावना..
अमाप दाटे या मनी..सखे जिव्हाळा भावना ..
जवळीकही सरसावली ओठात ओल्या भावना..
ओठासही मग सुटतो..थरथरून येतो कंप हा...
मिठीत घे आज तू.. कर बंधमूक्त   भावना...
विहंग हे नभातले..असे भेटती का सांगा ना..
सौंदर्य जे मनातले आज उमगले ह्या मना...
म्हणूनच हि कविता..व्यक्त करण्या भावना....
@ओम(अमोल२२कर)

Friday, 17 August 2012

अशी कशी सखे तू...?

 नाजूक लाजणारी.... गालात हासणारी...
चोरून पाहणारी ...अशी कशी सखे तू...?
साधीच राहणारी ...मानस मोहणारी...
नजर चोरणारी.. अशी कशी सखे तू... ?
काजळकिनारी डोळा..ओठात स्पर्श ओला..
रुसता धरी अबोला.. अशी कशी सखे तू... ?
मी स्पर्शता शहरा......तोडूनी पहारा....
तरी दावतेस तोरा.. अशी कशी सखे तू... ?
मज भेटण्यास येशी...स्वप्न दाटूनी उराशी..
ना बोलताच जाशी..अशी कशी सखे तू...?
@ओम(अमोल२२कर)

Thursday, 16 August 2012

माळून घे गजरा सखे....

आज तू ...सजता सखे.. माळून घे गजरा सखे....
आरशाला.. सांग तू....माझी तुझी कथा सखे....
भेटता अशीच तू....चालताना तू सखे....
बहरून आली वाट रे..सोबतीला तू सखे...
मी तुला हवा हवा...का?  कसा झालो सखे...?
हृदयातही, स्वप्नातही ..स्वार का झालो सखे ?
हिंडून तू  जगात या..स्थिरावली इथे सखे...
बंधात तू ग कोणत्या? बांधली गेली सखे..
ओढही लागे तुला..माझीच का माझी सखे..
अथांगही आकाश हे..थांग का माझा सखे ..?
@ओम(अमोल२२कर)

Tuesday, 14 August 2012

आपण स्वतंत्र झालो का?


आज दिवस स्वतंत्रतेचा...पण आपण स्वतंत्र झालो का?
विचारांनी, आचारांनी..खरच स्वतंत्र झालो का?
म्हणे स्वातंत्र्य सगळ्याचेच...हवे तसे वागण्याचे ....
कि स्वातंत्र्याच्या चादरीआड ..स्वैराचार लपविण्याचे...?
आजही बरेचशे पारतंत्र्यातच...घर कुटुंब समाजाच्या....
सगळ काही असूनही...धब्बा मात्र विकसनशीलतेचा....
ज्याला हवा तसा आज ..तो स्वराज्याचा अर्थ लावतो...
महाराजांच्या स्वराज्याला...स्व  राज्य  म्हणतो....????
इतकच काय ते शिल्लक आहे का?शुल्लकशा मनात?
वर्तमानात बोंब पण...भाष्य मात्र  इतिहासात.....??
कोवर असं भूतकाळात बेछूट रमत राहायचं?
मग येणाऱ्या पिढ्यांना काय आपण द्यायचं?
आपला वर्तमान त्यांचा इतिहास झाला असेल....
एकदा विचार मनास..मग त्यांना काय दिसेल?
गेलेल्या अन येणाऱ्या पिढ्यांचं आपण देन राखतो....
का राखण्याच्या नावाखाली..जो तो पाणी चाखतो..???
खरच का हो विचारांना,आज वाळवी लागली आहे?
फुकट मिळालेल्या देणगीची..काही  किंमत राहिली आहे?
दोनच दिवस का आठवतो मग कित्येकांना तिरंगा....?
१५औग. च्या नावाने डिस्को पार्ट्यांचा दंगा....
"celibration" आज भावनांनाही जुमानत  नाही...
योग्य गोष्टींकडे आज  का डोळे पाहत नाही....?
ताटाखालाच मांजर व्हायला ...हे स्वातंत्र्य आहे का?
मोडेस्तोवर वाकायला ...हे स्वातंत्र्य आहे का?
दोन मिनिटे थांबा जरा...थोडा विचार करा....
माणसाने जनावरांचा ..गिरवायचा का धडा?
विचार नक्की करा..भले वेळ देवून थोडा.....
नाहीतर कोसत राहतील आपणास  येणाऱ्या पिढ्या.....
नाहीतर कोसत राहतील आपणास  येणाऱ्या पिढ्या.............
@ओम(अमोल२२कर)


प्रेम राधेवरी...



असे काय तरळले ...सखे मनाच्या कोपरी...
नाद कानी निनादतो ..कोण वाजवी बासरी...
असा खोडकर कसा...छळ लागती जिव्हारी..
तरी हसत सोसते...सारे छळ ती बिचारी....
कान्हा कान्हा ओरडते..ती उगाच आपूली..
राग नाही तिच्या मना..तरी दावते बावरी...
काहीच केले नाही..असे दावतो मुरारी... 
मग हळूच छेडतो...तिच्या मनाच्या सतारी..
त्यास कळतेच सारे...दावत नाही तरी...
उगा राधेच्या जीवाला..तो  कासावीस करी..
जरी  गोपिका हजारो..तरी प्रेम राधेवरी...
तिच्या इछेच्या खातर..पाडे पाऊसही दुपारी...
@ओम(अमोल२२कर)

Monday, 13 August 2012

तू सखे.....



आज द्यावी  तू सखे......आठवांची देन ही...
आज यावी तू सखे ...बाहूत माझ्या बिलगूनी....
युगे युगे शहराती.....ऐसी क्षणाची बांधणी...
विहरुया गगनात आता..विश्व हे सामावूनी..
साथीस आहे मी तुझ्या...अन सदैव राहीलही..
तेव्हाही पाहील मी..असाच गा डोळ्यातुनी..
माग जे हवे ते आता....ठेवू नको तू दडवूनी...
स्वप्नेच सारी तू सखे....उरात घेना ठासूनी..
काय मी द्यावे तुला?.... प्रश्न दाटे या मनी....
हक्काचे जे नाव माझे..बसलो सखेतुज जोडूनी....
@ओम(अमोल२२कर) 

Friday, 10 August 2012

ह्या घनाने बरसून यावे....

ह्या घनाने बरसून यावे....माझ्यावरी...माझ्यावरी...
ह्या मनाने झोकून द्यावे ...माझ्यावरी ...माझ्यावरी...
दाटून आले डोळ्यात सारे...चेतना अंगावरी....
होतेस वेडी शहारताना..कानी पडे जणू बासरी...
ओठात येती शब्द सारे...परि थांबती ते तिथवरी...
मी तुझ्या येता समोरी..राधा जशी तू बावरी...
कोवळ्या पाकळीस वेड्या...ओढ दवाची लागली...
श्वासही फुलाला सखे...कशी तू स्वत:ला सावरी...
कळते मला सारेच सारे...दडले जे तुझ्या मनी...
शब्द तुझ्या ओठातले....हवेत या ओठांवरी.....
सामावून घ्यावे मला सखे..तू अशा त्या सांझवेळी..
पाऊस..वारा..धुंदी किनारा...गंधास वेड्या सागरी.....
@ओम(अमोल२२कर)

तू आलीस......................

तू आलीस कवितांचा पाऊस घेवून...
भावनांचे थेंब वाहतायेत ओथंबून....
मी फक्त टिपणारा..भाव मात्र  तुझे..
हात फक्त चालतोय..येत सारं आतून....
अलगत आलीस तू...माझी झालीस तू...
माहित नाही मला..कसं आलं जुळून..
तुझ्या मनातील सारं..कळत सखे मला..
जातेस जेव्हा तू ..पाहते मला वळून..
मी मात्र हसतो...गालातल्या गालात..
डोळ्यातील गुपित ..मला येत कळून...
@ओम(अमोल२२कर)

नवी धार..

तुझ्या मनाने छेडली.. सखे मनाची  तार...
जणू मांडला ग सखे...नवा आपुला संसार...
जिथे सहवास तुझा...हवा कणासकणास...
या जीवनाच्या कामी..लागे तुझा हात भार...
स्वप्न नाही फार मोठे...असे  छोटेशे घरटे,,,
सुखांना त्या घरात...ना उरे पारावार.....
झोप सुखाने लागावी....दरी समाधान यावे...
तुझ्या पावलांनी व्हावी ..लक्ष्मी साकार...
बंद टाळे उगडावे...खुले मनाचे ग द्वार...
माझ्या लेखणीला यावी सखे नवी धार.. 
@ओम(अमोल२२कर)

सखे.....

चार ह्या भिंतीत वेड्या...जाहलो तुझा सखे.....
पाहता क्षणी खुणावती ..भिंतीत दडले आरसे...
तसवीर ऐसी रे उभी...गुंतले डोळे सखे...
भासही भासात आता ..वास्तवाचे भास हे ...
नयनी तुझ्या जे पाहिले..डोकावताना मी सखे....
वाटले मी पाहिले ...रूप विश्वाचे सखे.....
तुही कशी ओथंबली...सुखावली माझ्या सखे...
ओतून दान घेतले... तू होताना माझी सखे.....
मीही अवाक जाहलो..पाहताना रूप ते...
असेच नाते बहरू दे,..वाटते मना सखे.....
@ओम(अमोल२२कर)



Thursday, 9 August 2012

ये घना बरसाया पुन्हा...

पावसाच आणि प्रणयाच नातच काही वेगळ....
असाच तो अचानक आला त्या दिवशी....
अन भिजवून गेला खोडकरपणे.... रुजवून 
गेला बीजे एका नव्या सहवासाची...
काही मिनिटांसाठीची असलेली भेट काही
तासात बदलून टाकली त्याने .....
समुद्राचा किनारा.....घोंगावत गाणे म्हणणारा वारा....
उसळेल्या लाटा...भिजलेल्या वाटा.....
कडाडणारी वीज....भिनत चाललेली थंडी...
त्यात आपल्याला अजून जवळ आणायला 
पावसाने केलेला मारा....तुझ्या केसांतून 
दिमाखदारपणे ओघळणाऱ्या धारा....
शरिरात सुटलेला कंप....मनात दाटलेली ओढ...
डोळ्यांशी संवाद साधणारे डोळे....अंतर कमी होत 
असताना पोटात आलेले गोळे....अखेरीस बांध
तुटून मिठीत आलेली तू.....अन त्या भावनेने शहारलेला मी...
vibrating modeवर गेलेली तू silent modeवर गेलेला  मी...
पावसाबरोबर  बरसणारी तू अन सागराबरोबर सामावून घेणारा मी..
माझ्या शर्टाची बटने घट्ट धरणारी तू...तुझ्याभोवती हातांची 
तटबंदी करणारा मी......
तू वर पाहताच तुझ्या डोळ्यातून सर्वांगात भिनत जाणारा मी...
अन लाजून पापण्या हळुवार मिटणारी तू............................
मग माझे स्पर्श बंद डोळ्यांनी जाणून घेणारी तू......अन तुझे...
जाणून घेणारा मी..........
@ओम (अमोल२२कर)

Monday, 6 August 2012

..........कि आपण ?

 नक्की बरसत होतं कोण?
पाऊस कि आपण ?
नक्की भिजत होत कोण?
सर्वांग कि मन?
नक्की उधाणलेल होत कोण?
सागर कि आपण ?
नक्की आसुसलेल होत कोण?
कण कि जीवन ?
नक्की बेधुंद होत कोण?
वारा कि आपण?
नक्की शहारत होतं कोण?
स्पर्श कि ते क्षण?
नक्की गुंतत होत कोण?
प्राण कि आपण?
नक्की विरघळत होत कोण?
भावना कि बंधन ?
नक्की एकवटल होत कोण?
मिठी कि आपण?
नक्की धडधडत होत कोण?
हृदय कि आपण?
नक्की गुंतलेल होत कोण?
आपण कि स्पंदन..?
@अमोल२२कर 
 

 

Sunday, 5 August 2012

मैत्री....

मैत्री....म्हणजे मोकळ...रान...
पत्त्याच्या कॅट मधील...जोकराच पान.....
भावनांची देवाण घेवाण....अन...मस्ती..बेभान..
मैत्री...संवेदना मनाची...साथ क्षणा क्षणाची....
एकसंद बंध ....जोड  कणाकणाची...
मैत्री...म्हणजे प्रेम...जीवापाड जपलेलं...
एक नात तुझ माझ...ह्रिदयात लपलेलं...
मैत्री...म्हणजे दिशा...सुखाकडे नेणारी...
निरपेक्ष जाणीव..समाधान देणारी....
मैत्री...म्हणजे...तू...तूच तू दिसणारी ...
हसता हसता रडणारी...अन...रडता रडता हसवणारी....
@अमोल२२कर 

Tuesday, 10 July 2012

पहिला मी,,,पहिली तू.....

पहिल्या  प्रेमाचं पाहिलं  पाऊल...
पहिल्या  नात्याची  सुखद  चाहूल ....
पहिला  पाऊस...अन  एकच  छत्री ....
प्रेमात  बदललेली  एक  निखळ  मैत्री....
भिजत  भिजत  साधलेला  पहिला  प्रवास ....
एकांतात  बहरलेला   सहवास ...
अलगत  तुझ्या  डोळ्यातील  उलगडलेलं  गुपित ....
ओठांनी  ओठांशी  साधलेल  गीत ....
त्या  पहिल्या  स्पर्शाची पहिली  आस ....
तुझ्या  हट्टाखातर  भरवलेला  पहिला  घास ....
तुझ्या  जीवनातील  सगळ  पाहिलं .... मीच  मी ....
अन  माझ्या  जीवनातील  तूच  तू ....
@अमोल२२कर

Thursday, 14 June 2012

माझी माय......

एक होती... एक आहे... ह्रदयात माझ्या... नाव आहे...
माझे तिचे....एक गाव आहे... तिचाच नयनी... भाव आहे...
माझ्या मनाचा... तीऽऽसं... ठाव आहे...
ती... वादळातील...नाव आहे...
पुसू नका...ती कोण आहे?... काय आहे....?
फक्त मजसाठी....जगणारी ती.... माझी माय आहे.....
@ओम(अमोल२२कर)

Wednesday, 13 June 2012

पावसा..

आज तो पुन्हा आला...नेहमी सारखाच...
पण बाकी काहीच नेहमीसारखं नाही...
असंख्य आठवांचे बाण...मनाच्या आरपार
झालेत...अन गात्र  मात्र  गपगार झालेत...

असाच आला बरसत बरसत...काठांच्या भोवताली...
तीच चिमुकली आठवे सारी...पुन्हा उजागर झाली...
नकळत सारे घडले काही...अन उलगडले काही...
मनात माझ्या घट्ट मिठीने ..पुन्हा बिलगले काही...
तोच गारवा मनात सजला...त्याच ठिकाणा पाही..
पहूडलेलो आपण अलगत कधीकाळच्या वेळी...
अशी पाखरे कुण्या गावची? कुण्या ठिकाणी गेली..?
सानिध्याच्या शृंखला ती..ह्रिदयात ठेवूनी गेली...
काय म्हणावे तुला पावसा..असे कसे रे होई...
दूर पसरल्या क्षितीजालाही..ओढ अनामिक होई..
बरसत जा तू असा पावसा..वाटे धरणीलाही...
तुझ्याच वाचून तिच्या जीवाची, होते लाही लाही....

Tuesday, 12 June 2012

लायकी....

म्हणे  तू  स्वतःला बडा  राजबिंडा ...
तरी  भिक्कारडयापरी   घेतोस  रे  हुंडा ....
अशे  पेशावर , दलाल  साले  तुम्ही ,
लग्नसोहळा  तुमचा  (खांदा -नीच ) धंदा ..
नका  घेवू  नाव , छत्रपतींचे  मुखी ..,
असा  थोर  राजा,  ना  पाईस   रे  मिन्दा....
उष्टे  खाण्यात , माहीर , पिलावळीचा  तू ,
माझे  चाटण्यात  थुकेले, तुझा  हातकंडा....
दोन इंची  ऐवजाच्या , तू  गर्तेत  घोळ-लेला ....
जसा  तोंड  मरे , हर  फुलावरी  भुंगा ....
ती  वेळ  आता .... फार  दूर  नाही ...,
फिरशील  दारोदारी , गात , माझिया  अभंगा....
@ओम (अमोल २२कर )

ना इथे रे...

चंद्रास  ना इथे  रे  कमी  चांदण्याची ...
आज   रांग  लागलेली  इथे  तारकांची ....
असा  कसा  मी  रे  बंदिवान   होतो ...
दारात  थांबलेली ...बरसात  रे  सुखांची ...
चिंब  आज  भिजलो ...पुन्हा  त्या  सुखांनी...
नयनात  आज  माझ्या ,ईद  त्या  क्षणांची ...
आज  पूर  आला , पुन्हा  सोहळ्यांचा ...
खुशीच्या  तुशारे , गर्दी  आसवांची ...
पुन्हा  सिद्ध  झाला ..सिद्धांत   कर्म तेचा..
पुन्हा  पेटली   ती , वस्ती  कंटकांची ...
मी  सोसलेले  ते ,फक्त  थेंब  होते ...
तुटेल  तुजवरी  ती ,झुंड  सागरांची ....
@ओम (अमोल२२कर )

Wednesday, 25 April 2012

मन झाले ग फितूर

मन झिम्माड झिम्माड सखे पावसाच्या सरी..
नभ दाटले ग उरी ..तुझ्या माझ्या मिलनाचे..
काया आतूर आतूर....दाटे मनी हुरहूर..
मन झाले ग फितूर ..तुला पाहताना सखे....
@ओम(अमोल२२कर)

प्रणयाचे प्रलय......

प्रणयाचे प्रलय येताना जे वलय मनी तयार झाले...
तेच सखे आज कविता बनून आले...
   त्या प्रणयाच्या वाल्यांची लय अन जग बेधूंद
झालय...आता न कशाचं भय ,फक्त मिलनाच
सुख अभय..गारवा घेवून आलय..... जे झालय
ते जणू मंतरलेल सारं काही..
 नंतर अंतर कमी कि जास्त याची जराही तमा
नसताना..तुला हसताना ,मनी बसताना ..कमी
 होत जाणाऱ्या अंतराच दिव्यच काही वेगळ....
   विसावलेले अंग ,खुलून आलेले रंग ,सर्वांगातून
वाहणारे तरंग ..श्वासांचे जूळलेले अभंग..सारे विश्वाच
जाहले दंग....
      त्यावेळी अंगावर खुललेल्या रंगावर होणारा
तरंगाचा बहर अन दंगतेचा कहर निर्माण होवून
झालेल्या अभंगावर जेपण लिहाव ते कमीच
आहे सखे...
 
म्हणून मनाचा प्रवाह वाहत असताना..मी तुला
हवा असताना डोळ्यात निर्माण झालेली ओल
वर्णन्यासाठी अबोल झालेले बोल हृदयात खोल
खोल रुतताना,त्या अनमोल क्षणांची तुझी बहूमोल
असलेली साथ त्यावेळी मी शब्दात व्यक्त करू शकलो
नाही..त्या अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी ही
शब्दांजली ...सखे फक्त अन फक्त तुझ्याचसाठी...
@ओम(अमोल२२कर)

Tuesday, 24 April 2012

मी...

जिथे  पाणी  तिथे  मी .....
अढळ  अस्तित्व   लेवूनी ...
कधी धारान्तुनी... कधी  गारांतुनी...
 कधी  अश्रुन्तूनी .. कधी  घामातुनी ....
नदीत  मी ...सागरात  मी ...
दवबिंदूत  मी... पर्नात  मी ...
हिरव्या  उभ्या  कुरणात  मी..
हिमालयाच्या चरणात मी..
मातीत  मी  सामाउनी..
गंधात  मी..फुलात  मी ...
शिंपल्यात  मी ...साठून  मी ...
मोती  बनूनी  कंठात  मी ..
जळलो  तरी  हवेत  मी ..
सखे  तुझ्या  कवेत  मी ..
ह्या  न  त्या  रुपतुनी ..
जवळी  तुझ्या  मीच  मी .....
@ओम(अमोल२२कर)

Thursday, 19 April 2012

ओठी तुझ्या.....

ओठी  तुझ्या  ग होते .. राहील  नाव  माझे ..
ह्रिदयात  साठलेले .. जपशील  गाव  माझे ...
ते  स्पर्श  गोंदलेले .. अंग  अंगावरी  तुझिया ..
इंच  इंच  जाणतो  गा .. आपूस  ठाव  माझे ..
भिनलो  नसात  तुझिया .. श्वासात  खेळतो  मी ..
मनात  घोळतो  मी .. मांडून  डाव  माझे ...
हे  आव्हान  रे  तयाला ... पुसूनी  दाव मजला ...
तिच्या  अंतरित  तुजला .. दिसतील  भाव  माझे ..
घमंड  नसावे  इतके .. जिंकून  डाव  खोटे ..
उष्टेच  घास  तुजला ..भरतील  घाव  माझे ...
@ओम (अमोल२२कर) 

Wednesday, 18 April 2012

अजूनही मी..

शिंपल्यात साठलो मी ...मोती बनून आलो..
कंठात दाटलो मी ..बेधुंद गीत झालो..
पर्वा इथे कुणाला ? विसर ह्या जगाला...
मनात भावनांचा ....सूर्य मी जहालो...
माझी अजून प्रतिमा..मनात कोरलेली..
डोळ्यातही तयांच्या..स्वप्नात स्वार झालो..
उरले कुठे तरी ते...अवशेष आठवांचे...
पाऊस त्या क्षणांचे..देवून गार झालो...
आता कुटे तयांना..चाहूल पाउलांची..
वाटेस ज्या सुखाच्या..दावून वाट आलो..
@ओम(अमोल२२कर)

Tuesday, 10 April 2012

mazi sakhi...

सखे तुला पाहताना खरचं मन खूप भारावून जातं...
अन मनातलं आपोआप कागदावर येत...
   अस वाटतंय देवानं खास माझ्यासाठी बनवून
पाठवलंय तुला ...अजिंठ्याच्या लेनीतून .....
खरच तू अजिंठ्याच्या लेण्या मधूनच  आली आहेस...
तितकीच रेखीव ....तितकीच कोरीव....तितकीच वलयदार....
जणू सौंदर्याचा पूर यावा .....हि कोणती भूमिती ? हे कोणतं
सूत्र .....तुला पाहून हजारो वर्ष अजरामर होईल अशी
कलाकृती निर्माण करत येईल ...इतकी मोहक....
  इतकी मोहक ..इतकी सुडौल ....इतकी रेखीव ....
की कामदेवालादेखील भुरळ पडावी...इतकी मोहक ....
पाणीदार डोळे ....आरपार भेदणारी नजर... धनुष्याकृती
भुवया....नाक ....ओठ....अन.......
 रेखाटनांचा अन वालयांचा कहरच जणू तू....कितीही
पाहिलं तरी डोळ्याचं पारनच फिटत नाही ....तुला वर्णायला
शब्दच  अपुरे पडतील ...सौंदर्याच्या व्याख्याच बदलतील....
त्यानेदेखील फार निवांतपणे साकारल असेल तुला .....
इतक्या हळुवार ..अलगत .... जणू फुलाच्या पाकळ्या साराव्या
तसं... त्यालादेखील नंतर आश्चर्य वाटलं असावं त्याच्याच
कलाकृतीच ...अशी कलाकृती "न भूतो न भविष्यति;"..
अशी आहेस सखे तू ....माझी सखी.....
@ओम (अमोल२२कर)

Monday, 9 April 2012

dhruvatara...

आईच्या  कुशीत ,
विसावे  लेकरू ..
वाट  चुकले  कोकरू ,
घरला  येई ....
डोई  उन्हाचा  तडाखा ,
हसत  सोसे  तरू..
कोणी  वाटसरू , विसावेल ...
रातीला  दिशेचा
खेळ  होई सुरु  ..
काय  मी  करू ?  सुचेना  मज ..
तेव्हा  तुझी  याद
आई .. कशी मी नाकारू ..
वाट  दावणारी  तू  , ध्रुवतारा ..
ओम(अमोल२२कर)

asa vegala mi...

असा वेगळा मी तसा वेगळा मी..
डोळ्यातील तुझ्या उबदार ओघळा मी..
तुला न कळावे असे काही नाही ..
प्रभू शिवाप्रमाणे भोला भाबडा मी..
अंगी बनतो मी ना ना कला हजारो..
जरी परिधान करतो वेश बावळा मी..
सुखावून जाती तुला छळ आगळे माझे..
कारण मनातील तुझ्या कृष्ण सावळा मी..
@ अमोल २२कर

kahi manatale...

काही मनात माझ्या ते सूर ..चांदण्यांचे ...
नयनात दाटलेले ते पूर.... आसवांचे...
तुटलो बनून तारा..इच्छा तुझ्या फळाला...
आतूर या जीवाला..... काहूर भावनांचे...
@ओम (अमोल २२कर )

tu mi ani paus

पुन्हा एकदा पाऊस पडेल...नेहमीसारखा मनसोक्त बरसेल ...
तोच गारवा ...त्याचं सरी..तेच इंद्रधनुष्य ...पण मी नसेल...
तू भिजशील ..ओली चिंब..मन मात्र कोरडं कोरडं....
डोळे बंद कर..बघ आता मी तुझ्या अगदी जवळ असेल...
काही गणितं..जरी चुकली असली ..तरी पावसाच गणित
मात्र चुकत नाही ..त्याचं कामच आहे..कोरड्या जमिनीत
नवीन अंकूर रुजवण्याच..जुनाट सगळी भुरळ झटकून
नवी पालवी खुलवण्याच...
म्हणून तर तो माझा मित्र आहे...... म्हणतात ना पाणी
विद्युत प्रवाहाचा वाहक आहे ...लहानपणी वाचलेलं...
पण तसा तो भावनांचाही वाहक आहे ...हे मोठेपणी जाणवलं..
अंतर जरी जास्त असलं..तरी तो एकदाच बरसत.. असतो दोघांवर ..
अन जोडून टाकतो साऱ्या भावना ,स्वप्न, नाती नव्याने...
म्हणूनच नाती तुटत नाहीत जरी ती दुरावतात...
म्हणूनच नाती तुटत नाहीत जरी ती दुरावतात...
ह्रिदयाच्या कोन्यामध्ये नकळतच स्थिरावतात..
@ओम (अमोल २२कर )

ek sangavas wattay..

सखे एक खरं सांगावस वाटतय...
नौका बदलली तरी किनारे मात्र बदलत नाही.. ...
सागराची विशालता नदीला उमगत नाही.....
कितीही फिरली तरी नदी सागरालाच मिळते...
संगमाच्या जागेवर पुन्हा प्रीत जुळते...
तुही तशीच फिरशील.... बागडशील....अन परत येशील ..
अनाहूतपणे येणाऱ्या पावसासारखी....
पण लक्षात ठेव कितीही बरसलीस तरीही काहीच फरक पडणार नाही...
कारण तेव्हा काहीच तुझ्या मनासारखे घडणार नाही.....
म्हणून सांगतो आता ; इतक...ा उन्माद नसावा...उघड
उघड नजरेला न तो दिसावा....
म्हणून म्हणतो "थांब !! जरा विचार कर !! नको~~ त्या पापात...
घालू नकोस भर...ज्या गोष्टी दिसतात त्या असतातच अस नाही...
आणि ज्या गोष्टी असतात त्या दिसतातच अस नाही....
मनाचे घोडे थांबव ...आत्म्याची हाक ~ ~~ऐक....."
अशी संधी मिळणं देखील भाग्याचं असत ग...नशिबाला
धन्यवाद दे तू ..खरच नशिबाला धन्यवाद दे तू ....
सखे नशिबाला ठोकारण्यात तुला मजा वाटते ना..ती मजा खुशाल
अनुभव ...पण ज्या वेळेस नशीब तुला ठोकर मारेल..त्यावेळी
मात्र सगळं चित्र फिरेल... अगदी डोळ्यासमोर अंधारी यावी तसं....
तोंडातून घास पडावा तसं....आकाशात उंच उडणाऱ्या पक्षाला
नशिबाच्य बाणाने टिपाव आणि भिरभिरत त्याने खाली पाडाव तसं....
म्हणून फक्त एकदाच ,,फक्त एकदाच~~.. ह्या वेड्या ज्योतिषाचे शहाणे
बोल ऐकून घे...खरच ग ...फक्त एकदाच..एकदाच..एक.........................
@ओम (अमोल२२कर)

sakhe

सखे.. 
मनात विचारांचे काहूर माजलेले असतानाही ....
भावनांनी उर दाटलेला असतानाही...तुझ्या मनाची होणारी
हूरहूर मला जाणवते आहे...तुझ्या डोळ्यात आसवांचा पूर
आलेला असताना ..काही गोष्टी कायमच्या दूर जात असताना..
जुने सूर विरून नवे सूर लागताना ...तुला माझी खरोखर
गरज असताना मी तुझ्याजवळ नाही याची मला खूप खंत
वाटते ग.....
पण खंत वाटूनही काही गोष्टींचा अंत टाळता येण
अशक्य असल्याची खंत मात्र अंताला जात नाही..कारण आता
पसंत बदललेली असल्यामुळे इच्छा असूनही उसंत काढण्यादेखील
मन धजावणार नाही ....
@ओम (अमोल२२कर )