Thursday, 9 August 2012

ये घना बरसाया पुन्हा...

पावसाच आणि प्रणयाच नातच काही वेगळ....
असाच तो अचानक आला त्या दिवशी....
अन भिजवून गेला खोडकरपणे.... रुजवून 
गेला बीजे एका नव्या सहवासाची...
काही मिनिटांसाठीची असलेली भेट काही
तासात बदलून टाकली त्याने .....
समुद्राचा किनारा.....घोंगावत गाणे म्हणणारा वारा....
उसळेल्या लाटा...भिजलेल्या वाटा.....
कडाडणारी वीज....भिनत चाललेली थंडी...
त्यात आपल्याला अजून जवळ आणायला 
पावसाने केलेला मारा....तुझ्या केसांतून 
दिमाखदारपणे ओघळणाऱ्या धारा....
शरिरात सुटलेला कंप....मनात दाटलेली ओढ...
डोळ्यांशी संवाद साधणारे डोळे....अंतर कमी होत 
असताना पोटात आलेले गोळे....अखेरीस बांध
तुटून मिठीत आलेली तू.....अन त्या भावनेने शहारलेला मी...
vibrating modeवर गेलेली तू silent modeवर गेलेला  मी...
पावसाबरोबर  बरसणारी तू अन सागराबरोबर सामावून घेणारा मी..
माझ्या शर्टाची बटने घट्ट धरणारी तू...तुझ्याभोवती हातांची 
तटबंदी करणारा मी......
तू वर पाहताच तुझ्या डोळ्यातून सर्वांगात भिनत जाणारा मी...
अन लाजून पापण्या हळुवार मिटणारी तू............................
मग माझे स्पर्श बंद डोळ्यांनी जाणून घेणारी तू......अन तुझे...
जाणून घेणारा मी..........
@ओम (अमोल२२कर)

1 comment: