आज दिवस स्वतंत्रतेचा...पण आपण स्वतंत्र झालो का?
विचारांनी, आचारांनी..खरच स्वतंत्र झालो का?
म्हणे स्वातंत्र्य सगळ्याचेच...हवे तसे वागण्याचे ....
कि स्वातंत्र्याच्या चादरीआड ..स्वैराचार लपविण्याचे...?
आजही बरेचशे पारतंत्र्यातच...घर कुटुंब समाजाच्या....
सगळ काही असूनही...धब्बा मात्र विकसनशीलतेचा....
ज्याला हवा तसा आज ..तो स्वराज्याचा अर्थ लावतो...
महाराजांच्या स्वराज्याला...स्व राज्य म्हणतो....????
इतकच काय ते शिल्लक आहे का?शुल्लकशा मनात?
वर्तमानात बोंब पण...भाष्य मात्र इतिहासात.....??
कोवर असं भूतकाळात बेछूट रमत राहायचं?
मग येणाऱ्या पिढ्यांना काय आपण द्यायचं?
आपला वर्तमान त्यांचा इतिहास झाला असेल....
एकदा विचार मनास..मग त्यांना काय दिसेल?
गेलेल्या अन येणाऱ्या पिढ्यांचं आपण देन राखतो....
का राखण्याच्या नावाखाली..जो तो पाणी चाखतो..???
खरच का हो विचारांना,आज वाळवी लागली आहे?
फुकट मिळालेल्या देणगीची..काही किंमत राहिली आहे?
दोनच दिवस का आठवतो मग कित्येकांना तिरंगा....?
१५औग. च्या नावाने डिस्को पार्ट्यांचा दंगा....
"celibration" आज भावनांनाही जुमानत नाही...
योग्य गोष्टींकडे आज का डोळे पाहत नाही....?
ताटाखालाच मांजर व्हायला ...हे स्वातंत्र्य आहे का?
मोडेस्तोवर वाकायला ...हे स्वातंत्र्य आहे का?
दोन मिनिटे थांबा जरा...थोडा विचार करा....
माणसाने जनावरांचा ..गिरवायचा का धडा?
विचार नक्की करा..भले वेळ देवून थोडा.....
नाहीतर कोसत राहतील आपणास येणाऱ्या पिढ्या.....
नाहीतर कोसत राहतील आपणास येणाऱ्या पिढ्या.............
@ओम(अमोल२२कर)
No comments:
Post a Comment