तुझ्या मनाने छेडली.. सखे मनाची तार...
जणू मांडला ग सखे...नवा आपुला संसार...
जिथे सहवास तुझा...हवा कणासकणास...
या जीवनाच्या कामी..लागे तुझा हात भार...
स्वप्न नाही फार मोठे...असे छोटेशे घरटे,,,
सुखांना त्या घरात...ना उरे पारावार.....
झोप सुखाने लागावी....दरी समाधान यावे...
तुझ्या पावलांनी व्हावी ..लक्ष्मी साकार...
बंद टाळे उगडावे...खुले मनाचे ग द्वार...
माझ्या लेखणीला यावी सखे नवी धार..
@ओम(अमोल२२कर)
No comments:
Post a Comment