देवा तू आयुष्याचा...जुलूस मांडला आहे...
जीवनाच्या तू बाजरी ..माणूस खांडला आहे..
हीच क्रांती उत्क्रांती?सांग मला तू आता?
जनावारांहून खाली,माणूस भांडला आहे....
पराधीन का केला? भक्तीच्या नावाखाली...?
दिशाभूल झुन्डींचा.. कळप सांडला आहे...
बुद्धीचा द्योतक माणूस, अंध कसा रे झाला?
भोन्दुंच्या ताटाखाली का उगा डांबला आहे ?
धावून ये तू आता..तुझे सोडण्या कोडे...
हा चालायाचे सोडून..... उगा थांबला आहे.....
@ओम(आमोल २२कर)
@ओम(आमोल २२कर)
No comments:
Post a Comment