येथेच काल होता ..माहोल तो निराळा...
एकांत आज वेडा..बाकी कुणी दिसेना....
बाके अशी रिकामी..मनात पोकळी का?
आहे तसेच सारे...काही तसे दिसेना...
मैत्रीत धुंद वेड्या..वाटा गहाळ झाल्या..
ते झुंड पाखरांचे..आता पुन्हा दिसेना...
आज आसवांचे ...मोती बरेच झाले...
आज आठवांना..रस्ताच का उरेना?
क्षितिजापाल्याड गेले..सारेच सोबती ते..
ह्रिदयात कोरलेले एक नावही पुसेना...
@ओम(आमोल २२कर)
No comments:
Post a Comment